Tuesday, March 7, 2017

Badalon Se (Satya) बादलोंसे (सत्या)

This song is truly close to my heart. A deadly combination of Gulzar, Vishal Bharadwaj, and Bhupinder! Bhupinder has depth in his voice which is used perfectly in this sort of lounge music by Vishal. And the music provides well deserved justice to Gulzar's lyrics.


बादलोंसे चे माझया  हृदयात एक वेगळेच स्थान आहे. त्याचे थोडे मराठी रूपांतरण करायचा हा प्रयत्न. अर्थात गुलझारच्या  काव्याची सर नाही याला पण तरी आपले असेच ;)

तुला एकदा पावसात भिजताना पाहिलेले
जणू काही धबधब्याचे पाणी तुषारणारे
तेव्हापासून माझ्या स्वप्नांमध्ये बरसत असतेस
घडघड बोलतेस आणि खळखळ हसतेस
जे तुला ओळखत ही नाहीत अशांना तुझे नाव विचारतो
हे मला रे काय झाले .. (मी असे हे का करतो )
अशी अर्धवस्त्रांकीत गुलाबी किनार्‍यावर येत जाऊ नकोस
मिठूर समुद्रात  असे हे खेळ खेळत जाऊ नकोस
दिवसभर एक चांदणे पसरलेले राहते
आणि गुलाबी ऊन गोंधळून जाते
जांभळाच्या नाजूक फांदीवर नखाने ते नाव कोरतो
हे मला रे काय झाले .. (मी असे हे का करतो )
ढगांतूंन कापून कापून ते नाव मी कागदावर जोडतो
हे मला रे काय झाले .. (मी असे हे का करतो )
रात्रभर त्या चंद्राला दोर्‍यांनी बांधत बसतो
हे मला रे काय झाले ..(मी असे हे का करतो )



  



Enjoy !

No comments:

Post a Comment