Thursday, December 15, 2016

Humma Humma ... हम्मा हम्मा

Following post is based on my comments about new (2016) Humma Humma song from OK Jaanu and nostalgia about original 1995 movie Bombay.

First watch new song.





The music is recreated by Badshah & Tanishk Bagchi. A nice touch of rap and dubsteb. But on screen pair and picturization doesn't show the passion between leading pair. According to me it fails flat. For the same situation Maniratnam creates magic in his original movie OK Kanmani. You can see chemistry between hero and heroin.




Now some comments in Marathi.

ओ जानू शाद अली ने बनवलेला आहे त्यामुळे थोडाफार बघण्यालायक असावा  साथिया पेक्षा मला अलैपयुते मधल्या गाण्यांचं टेकींग जास्ती आवडलेलं. अर्थात मणिरत्नम तो मणिरत्नम आणि शाद अली तो शाद अली. 
डब स्टब मध्ये कन्व्हर्ट मस्त जमलंय. पण पडद्यावर अजिबात केमिस्ट्री दिसत नाही. वरूण वगैरे कोणीतरी दुसरा पाहिजे होता. अदित्य रॉय कपूर गाणं किंवा श्रद्धा कपूरला एंजॉय करतोय असं वाटतच नाही. त्याच्या चेहर्‍यावर त्रासलेले भाव वाटतात. परवाच के३जी चा रीरन चालू असताना सुरज हुआ मधम पाहिलं त्यात दोघेही किती पॅशनेट वाटतात. या गाण्यात तर अजून तसे वाटायला हवे होते. इव्हन ए उडीउडी मध्ये विवेक ओबेराय चांगलाय मग 
आणि शाद अली आणि मणिरत्नम मधला थोडाफार फरक या गाण्याच्या मूळ गाण्यातही दिसून येतो. ओ के कन्मनी मधलं गाणं बघ. त्यात हिरो - हिरॉइन मधली केमिस्ट्री बरोबर दिसतीये. हिरो ला काही तरी करायचंय आणि हिरॉइनला ही ते हवंच आहे पण पुढे जायचा धीर होत नाहीये. त्यामुळे फक्त गाणं म्हणा असा भारी माहौल बनलाय. ओके मधलं मिलेनियल प्रेम बरोबर वाटतं. आयपॅड वर बीट बॉक्स लाऊन धमाल करताना एकमेकांबरोबर चिडवाचिडवी, सूचक बघणं, डोळ्यांत भाव दिसणं असे सगळे दिसते त्यात.
बॉम्बे संध्याकाळचा शो माधव टॉकीज मध्ये पाहिलेला. पोलिस बंदोबस्त होता. रात्री अंधार असतो त्यामुळे बाबांनी एक टॉर्च बरोबर घेतला होता तर तो पूर्ण उघडून पाहिला. फुल लाईन लावून चेकींग चालू होती. ओळखिचे थिएटर समोर राहत असल्याने आरामात तिकीटं मिळाली होती. पण तरी ही लाईन लावायलाच लागली होती. असं थिएटर बाहेर लाईन मध्ये उभे राहून चेकिंग वगैरे बघण्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे फार वेगळे वाटले. नंतर लाईन मध्ये उभे राहून तिकीट काढताना , स्टॉल करता (तिकीट नंबर नसतात म्हणून) लाईन लावताना अगदी रखवालदाराचे दंडुके पण खाल्ले आहेत. पण हा पहिला अनुभव जाम भारी होता. 
Original Humma Humma