Saturday, December 28, 2013

तुमको देखा तो ये खयाल आया …

एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे. असा नायक साकारला होता फारुख शेख नी.

मुंबई मधील एका वकिलाचा तरुण मुलगा ज्याने स्वतः कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि वकिली सुरु केली. पण त्या काज्ज्या खटल्यांमध्ये याचे कलाकारी मन काही रमेना. कॉलेज जीवनात भरपूर नाटके केल्यामुळे तशा ओळखी होत्या आणि अनुभवही होता. त्या अनुभवावर त्याला 'गर्म हवा' मध्ये एक पात्र मिळाले. त्या चित्रपटातील त्याचा अनुभव पाहून सत्यजीत रायनी त्याला त्यांच्या 'शतरंज के खिलाडी' मध्ये घेतले. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपट चळवळ सुरु होती तो त्याचा उदयाचा काळ ठरला.

त्यानी ७० आणि ८० च्या दशकांत बरेच सामान्य माणसाला जवळचे वाटणारे चित्रपट केले त्यात आम्हाला तो जवळचा वाटला तो 'साथ साथ' मध्ये आणि 'चष्मेबद्दूर' मध्ये. यापैकी साथ साथ मध्ये त्यांनी लग्नानंतर जवाबदारीने माणूस कसा बदलतो आणि मग त्याला त्याची हाव अजून खाली खेटते हे अत्यंत परिणामकारक रीतीने दाखवले. चष्मेबद्दूर मध्ये तीन कॉलेज कुमार असताना हा त्यातला एक साधा सरळ सज्जन मुलगा होता. मुलीला भेटल्यानंतरचा सुरवातीचा नवखेपणा आणि नंतर भांडणानंतरचे नैराश्य त्याने उत्तमरीतीने साकारले. त्याची खर्या जीवनातील सहचारिणी त्याला कॉलेज मध्ये नाटकातच भेटली त्यामुळे बहुतेक त्याला ते साकारणे अवघड गेले नाही.

नंतरच्या काळातही तो सतत कार्यमग्न राहिला. 'जी मंत्रीजी' ही मंत्री आणि त्यांच्या सचिवांवर आधारित विनोदी मालिका केली. त्याचबरोबर 'जीना इसिका नाम हैं' हा मुलाखतींचा कार्यक्रम ही केला. २००९ मध्येच त्याला 'लाहोर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे तो अजूनही उमेदीतच होता असे मी म्हणेन. त्याचे असे अचानक जाणे म्हणजे आपल्या कॉलेज जीवनातील एक मित्र सोडून जाण्यासारखे वाटते आहे.

                                  

Thursday, December 12, 2013

Mala Ved Laagale ...

A teen love story, a simple Marathi girl next door, a rowdy boy - you just need some great songs in this mixture to make a perfect romantic movie.  And Timepass combines all these ingredients to make the perfect blend. Mala Ved Laagale is picturized on Ketaki Mategaonkar and Prathamesh Parab. They make the perfect couple described earlier. Director Ravi Jadhav has selected the usual canvas of a rainy day but he elevates it to the next level by painting a real life middle class neighborhood and two lovers madly in love (Ved = madness).

The song is composed by Chinar-Mahesh. They have created the true modern but still a warm in heart melody for this song. Swapnil Bandodkar is one reliable performer in Marathi movies now. The true surprise in this song is the beautiful voice of Ketaki. We all knew she has a great voice but this song gives her great exposure to the mainstream singing besides kids' songs. She has handled the music very well and complimented Swapnil's voice. You can say on screen and in singing she has became a true celebrity of Marathi film industry in no time.





Enjoy!!